पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाकडून होम कॉरंटाईनचा भंग

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाकडून होम कॉरंटाईनचा भंग झाल्याचं समोर आलंय. वारंवार घराबाहेर फिरणाऱ्या या तरुणाला आज पालिका प्रशासन आणि पोलिसांनी थेट रुग्णालयातच दाखल केले. नॉर्वे वरून आलेला या तरुणाला तीन दिवसांपूर्वी 14 दिवस होम कॉरंटाईनच्या सूचना होत्या. मात्र, तो नेहमी घरातून बाहेर पडायचा, पाहुण्यांचीही ये जा सुरू होती, एसीमध्ये न बसण्याचा सल्ला दिला असताना ही त्याने एसी ऑपरेटरला घरात बोलावलं, अशा तक्रारी येत होत्या.

म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याला समज ही दिली होती. मात्र, तरीही नियम न पाळल्याने त्याला रुग्णालयातच दाखल करण्यात आलं,

होम कॉरंटाईन केलेल्या या तरुणाची पाहणी करण्यासाठी आरोग्य विभाग गेले असता त्याने कहरच केला. त्याच्या घरी तपासणीसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी गेले. तेव्हाही तो तरुण घराला कुलूप लाऊन पत्नी आणि वडिलांसोबत बाहेर पडला होता. ही बाब त्याने पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या कानावर टाकताच सर्वांना धक्का बसला. पोलिसांना पाचारण करण्यात आलं, त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला.

तेव्हा काही वेळाने तो, पत्नी आणि वडील गाडीतून घरी आले. मुळात फिरायला बाहेर पडलेला या तरुणाने बँकेत गेल्याची थाप मारली. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. तो होम कॉरंटाईनचे वारंवार उल्लंघन करत असल्याने शेवटी त्याला भोसरी येथील पालिकेच्या नव्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याला रुग्णालयातच कॉरंटाईन केलं जाणार आहे

Share this: