कोरोना व्हायरस ;पळून गेलेल्या आठ डॉक्टरांना 14 दिवस घरामध्येच ‘ होम क्वॉरंटाईन’

पिंपरी:(वास्तव संघर्ष) पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा वाढता आहे . आजपर्यंत 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे . त्यामध्ये बहुतांश बाधित परदेशातून आलेले आहेत . चीन , डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया , फ्रान्स , जर्मनी , स्पेन , इटली , इरान , दुबई , सौदी अरेबिया , युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका . कतार . ओमान . कवेत आणि यनाटेड अरब अमिरात या देशांमधून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस घरांमध्येच ‘ होम क्वॉरंटाईन ‘ करणे बंधनकारक आहे .

त्यानुसार महापालिकेकडून ‘ होम क्वॉरंटाईन ‘ चे आवाहन केले जात आहे . मात्र पुणे व पिंपरी – चिंचवड शहरातील 15 डॉक्टर युरोपवारीला गेले होते . ते नुकतेच मॉस्कोतून परतले आहेत . पुण्याच्या विमानतळावर त्यांनी नजर चुकवून पळ काढला होता . त्यात पिंपरी – चिंचवडमधील तब्बल आठ डॉक्टर आहेत . या डॉक्टरांनी सहकार्य करण्याऐवजी माहिती देण्याचे टाळले . मात्र , पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . अनिल रॉय यांनी त्यांना वारंवार संपर्क साधला . त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली . आता त्यांना 14 दिवसांसाठी ‘ होम क्वारंटाइन ‘ केले आहे

Share this: