कोरोना व्हायरस ;जनजीवन सुरळीत होईपर्यंत रिक्षावरील कर्जाचे हप्ते बॅंकेने मागू नये:- अॅड. मिलिंद कांबळे

पिंपरी:(वास्तव संघर्ष) पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा वाढता आहे .त्यातच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी’ जनता कर्फ्युचे रवीवारी आव्हान केले आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक माञ पॅशेजर भेटत नसल्याने ञस्त झाले आहेत.

पॅशेजर नाहीतर पैसा नाही आणि पैसा नाही म्हणून घर चालवणे कठीण होत चालले आहे अशातच कर्ज काढून घेतलेली रिक्षाचा हप्ता (EMI) ही भरता येत नाही. बॅक फायनान्स हे रिक्षाचालकांना फोन करून ञास देत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट टळून जनजीवन सुरळीत होईपर्यंत, मार्च एंडिंगच्या निमित्ताने सध्या अर्थिक संस्था व प्रशासनच्या कर वसुली विभागाकडून सुरू असलेल्या EMI व कर भरणा वसुली स्थगित करण्याचे आदेश द्यावेत या करिता मा.जिल्हाधिकारी पुणे यांना वंचित बहुजन आघाडीचे युवक उपाध्यक्ष अॅड. मिलिंद कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Share this: