महाराष्ट्रात कोरोनाचा तीसरा बळी ;मुंबईतील ६८ वर्षीय रुग्ण दगावला 

File Photo

वास्तव संघर्ष आॅनलाईन -महाराष्ट्रात कोरोनाचा तीसरा रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. ६८ वर्षीय रुग्णाला काही दिवसांपूर्वीच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज रोजी  कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनाच्या बळींची संख्या तीन झाली आहे . राज्यात काल संध्याकाळपासून 15 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत . त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 89 पर्यंत वाढली आहे . नवीन रुग्णांपैकी 14 मुंबईतील तर एकजण पुण्यातील आहे . राज्यातील आतापर्यंतचे कोरोनाचे तिन्ही बळी मुंबईत गेले आहे .

तिसरी मृत व्यक्ती फिलिपाइन्सची नागरिक होती . ही व्यक्ती प्रारंभी कोरोना पॉझिटीव्ह होती . उपचारानंतर घेतलेल्या चाचणीचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला होता . त्यांना मधुमेह व दम्याचाही आजार होता . मूत्र उत्सर्जन बंद पडून तसेच श्वसनाच्या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बृहन्मुंबई महापालिका वैद्यकीय विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .

‘ जनता कर्फ्यु झाल्यानंतर कोरोना संपला ‘ या भ्रमात राहू नका . परिस्थिती अजूनही गंभीर असून लोकांनी घराबाहेर पडणे , गर्दी करणे टाळावे , स्वतःची व इतरांची काळजी घ्या , महाराष्ट्रात रक्तांचा तुडवडा होत असून रक्तदान करण्याचे आवाहन देखील यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे .

Share this: