सांगवीत घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरी चिंचवडमधील सांगवी वाकड परिसरात दिवसा मोटारसायकलवर फिरून बंद घराची पाहणी करायचे आणि रात्रीच्या वेळी दरवाजाचा कडी – कोयंडा तोडून घरफोडी करणा – या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली . त्याच्याकडून 15 लाख 13 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड मधील तीन तर पुणे शहरातील 11 गुन्हे उघडकीस आले आहेत .

रफिक हुसेन शेख ( वय 26 , रा . ससाणे नगर , हडपसर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस रेकोर्डवरील आरोपींची माहिती काढून त्यांचा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करत असताना आरोपी शेख याने सांगवी आणि वाकड परिसरात मागील काही दिवसांपूर्वी घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले . त्यामुळे , पोलिसांनी सांगवी परिसरात सापळा रचून शेख याला अटक केली . त्यांच्याकडे तपास केला असता त्याने मागील आठ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी – चिंचवड आणि पुणे शहरात 12 ठिकाणी घरफोडी तर दोन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे सांगितले . पोलिसांनी त्याच्याकडून 367 ग्राम सोन्याचे दागिने , 279 ग्राम चांदीचे दागिने , दोन मोटारसायकल असा एकूण 15 लाख 13 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

Share this: