संचारबंदीत घरघुती गॅसचा काळाबाजार ; ४६ गॅससह आरोपींना खडकी पोलिसांनी केली अटक

File Photo

पुणे (वास्तव संघर्ष) :पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा देणा-यांना सरकारने सुट दिली आहे. यात घरघुती वस्तू , गॅस , अन्यधान्य , मेडिकल सेवा आहेत .मात्र याच संचारबंदीचा गैरफायदा घेऊन ७९०रुपयांचा घरगुती गॅस १२०० रुपयांना विक्रीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे .

ही घटना आज शुक्रवारी खडकी येथे घडली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक अमोल भोसले यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

खडकी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे . त्यांच्याकडून ४६ गॅस जप्त केले आहेत . नरेंद्र रघुवीरसिंग ठाकूर ( वय ३१ , रा . दापोडी ) , विजय जीवन मुदलियार ( वय ४५ पत्ता माहिती नाही ) , श्रीकांत विश्वासराव पाटील आणि ऋषीकेश श्रीधर भोपटकर ( वय ४७ ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत .

Share this: