कोरोना व्हायरस :पिंपरी चिंचवड शहरातील कलाकारावर उपासमारीची वेळ

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरात पंचवीस लाखाच्या घरात लोकसंख्या असून याच पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 1000 कलाकार आहेत. यात वाजंञी पासून गायक देखील आहेत. मार्च ते मे या 3 महिन्यात याञा-जञा उत्सव, छञपती शिवाजी महाराज जयंती, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी कार्यक्रमातून मिळणा-या मानधनात या कलावंतांची वर्षभराची कमाई होत असते.

पण करोनामुळे सगळ्या यात्रा-जत्रा जयंत्या कॅन्सल झाल्यामुळे खूप नुकसान झालं आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या कलाकारावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी सरकारने विचार करावा आणि त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी परिवर्तन कला महासंघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गायक विशाल ओव्हाळ यांनी केली आहे . पिंपरी चिंचवड मधील गायकांना वर्षभर कसलेही अनुदान मिळतं नाही हे विशेष!

कोरोना साथीचा तडाखा हा पिंपरी चिंचवड शहरातील कलावंतांनाही बसला आहे. या सर्व कलावंतांचे मुंबई, पुणे,नांदेड, नगर, सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यात दरवर्षी शोज असतात .कोरोनाच्या साथीमुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या शहरातील एकहजार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. म्हणूनच शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

Share this: