नरेंद्र मोदीं भिकार आणि नालायक माणूस – कॉग्रेस


वास्तव सघर्ष यवतमाळ -केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारविरोधात कॉग्रेस जनसंघर्ष याञेदरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर जहरी टीका करण्यात आली आहे.

यावेळी काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर पातळी सोडून टीका केली आहे . नरेंद्र मोदी हे’ भिकार नालायक’आहेत ‘नरेंद्र मोदींसारखा भिकार माणूस या देशात झाला नाही.

तर काँग्रेस चे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनीही मोदींवर जहरी टीका करताना ते म्हणाले ‘ देशवासीयांना नरेंद्र मोदींना मोठ्या अपेक्षेने सत्ता दिली. मात्र हा माणूस नालायक निघाला.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे,माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आ. नसीम खान, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी नेते उपस्थित होते.

Share this: