कोरोना व्हायरस : एकत्र जमाव जमवून इमारतीच्या टेरेसवर नमाज ‘ पठण ‘ ;चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- ‘ कोरोना ‘ या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १४४ कलमानुसार बंदचे आदेश देण्यात आले आहेत . तसेच एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश जिल्हाधिका – यांनी दिले आहेत. सर्व धर्मांच्या सार्वजनिक प्रार्थना स्थळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . मात्र या आदेशाला पिंपरी चिंचवड मधील चिखलीतील काही मुस्लिमांनी बगल दिलीआहे . शहरात एका इमारतीच्या टेरेसवर ४० जणांनी नमाज पठण केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ३८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील चिखली परिसरात शुक्रवारी ( दि . 27 ) ही घटना घडली आहे . पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

त्यानुसार पोलिसांनी गच्चीवर सापडलेल्या 13 जणांवर आणि पळून गेलेल्या त्यांच्या 20 ते 25 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत . भारतात देखील त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे . हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे . पुणे जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी धार्मिक स्थळांवर पूजा करण्यास तसेच एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे . आरोपींनी इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतानाही नमाजासाठी गर्दी जमवून सरकारी आदेशाचे उल्लंघन केले आहे .त्यानुसार ३८ जणांवर भारतीय दंड विधान कलम साथरोग प्रतिबंध अधिनियम कलम तीनसह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Share this: