बातम्यामहाराष्ट्र

बार्शीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरजू रुग्णांसाठी ९० जणांचे रक्तदान, नंदन जगदाळे यांच्या आव्हानाला दिला प्रतिसाद

बार्शी:( वास्तव संघर्ष) कोरोना मुळे राज्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये गरजू रुग्णांसाठी रक्ताची गरज ओळखून उद्योजक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी आपला वाढ दिवस रद्द करून आपल्या निकटवर्ती यांना रक्तदान करण्याचे आव्हान केले होते, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यक्तींनी रक्तदान केले यामुळे अतिशय महत्त्वाच्या प्रतिकुल परिस्थितीत गरजूंना या रक्ताचा लाभ होणार आहे. त्यामुळे आयोजक व रक्तदात्यांचे रुग्णांनकडूनआभार मानले जात असून विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. या उपक्रमाचे आयोजन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , सह्याद्री ग्रुप, जगदाळे परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.

या शिबिराचा प्रारंभ मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, तालुका पोलिस स्टेशन चे सह पो निरीक्षक राहुल देशपांडे, प्राचार्य डॉ प्रकाश थोरात, पोदर स्कुलचे संचालक संदीप बरडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.यावेळी छत्रपती शिवराय , कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे व स्व वायूपुत्र नारायण बाबा जगदाळे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक गुंड, शिवाजी महाविदयालयाचे उप प्राचार्य व्ही जे देशमुख, प्रा सुनील मारडकर, प्रा अनिल कांबळे, प्रा प्रदीप खडे यांच्या उपस्थिती करण्यात आला


कोरोना रोगाच्या साथीमुळे संपुर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढणे ही देखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शासना बरोबरच सर्व नागरीकांचे देखील प्रयत्न केले पाहिजे , त्या अनुषंगानेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले असल्याचे नंदन जगदाळे यांनी सांगितले व सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले.

या शिबिरात सध्यास्थितीत रक्ताची गरज लक्षात घेऊन ९० रक्तदात्याने उत्स्फूर्तपणे रक्तादन केले, हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रवी जगदाळे, गुणवंत खांडेकर, भीमराव मस्के,बंडू जाधव, धनु मुक्ते, विकास माने, अनिकेत जगदाळे, प्रतीक जगदाळे आदींनी परिश्रम घेतले. हे शिबीर

भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून घेण्यात आले.

Share this: