कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीत औषध फवारणी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : गांधीनगर झोपडपट्टीतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज 1 एप्रिल 2020 रोजी निर्जंतुकीकरण करण्यात आले. गांधीनगरमधील लोकांच्या आरोग्यासंबंधी स्थानिक नगरसेविका गिता सुशिल मंचरकर यांच्यातर्फे ही मदत मिळत असल्याचे दिसून आले. फवारणी मारण्याचे काम पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी सतीश घोलप, अशोक रंधवे, गणेश गावडे यांनी केले.

पञकार दिपक साबळे, अॅड. अशोक बडेकर, निलेश हेद्रे, अजय शेरखाने, चंद्रकांत बोचकुरे,सिद्धार्थ शिरसाठ विक्की शिंदे,जितेश खिल्लारे, अक्षय जोगदंड, गणेश खरात, विजय गायकवाड, सनी वडमारे, उमेश कांबळे, विशाल पवळ, मनोज मोरे, संतोष भालेराव, अमोल बो-हाडे ,दत्ता वाघमारे, सोमनाथ चव्हाण, अजय च-हाटकर, राहुल शिंदे, मनोज गायकवाड, संदिप गायकवाड, मनोज गजभार, समाधान बो, योगेश अडागळे, संजय गायकवाड या तरूणांनी गांधीनगर झोपडपट्टीतील नागरिकांना फवारणी असल्याने घर बंद करा असे आवाहन करण्यात येत होते.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात २ कोरोनाबाधित रुग्ण असून राज्यातील रुग्णांचा आकडा दोनशेच्या पार गेला आहे . ही संख्या नियंत्रणात रहावी यासाठी प्रशासनाकडून  प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून गांधीनगर झोपडपट्टी भागात फवारणी केली गेली. कोरोना विषाणूंचे संक्रमण अजून पसरू नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे.

Share this: