संचारबंदी आदेशाची ऐैसी- तैसी ;पिंपरीतील अनधिकृत भाजी मार्केट वर कारवाई

पिंपरी (वास्तव संघर्ष) – जमावबंदीमुळे काही फरक पडत नसल्याने पिंपरीतील भाजी मार्केट वर बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाई करण्यात आली आहे . संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी यातून जीवनावश्यक वस्तू आणि ‘ सोशल डिस्टन्सिंग ‘ चे भान पाळत भाजीपाला खरेदीला सूट देण्यात आली आहे . पण लोक भाजीपाला खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून सुरक्षेच्या कोणत्याच नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

सकाळ पासूनच पिंपरी भाजीमंडई मध्ये लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून आले . . संचारबंदीला न जुमानता नागरिक गाडी घेऊन बाहेर पडत आहेत व भाजी मंडईमध्ये गर्दी करताना दिसत आहेत . संचार बंदीचे गांभीर्य भाजी विक्रेत्यांना नाही , संचारबंदी आदेशाची ऐैसी- तैसी केल्यामुळेच पिंपरीतील अनधिकृत भाजी मार्केट वर कारवाई करण्यात आली आहे.

Share this: