बातम्यामहाराष्ट्र

बारामती येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा;डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन

बारामती (वास्तव संघर्ष) : राज्यात दरवर्षी १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी जनतेस विवीध प्रकारे डेंग्यू आजाराबबत माहिती देण्यात येते.या अनुषंगाने बारामती येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डेंग्यू आजाराची माहिती व डेंग्यू विषयी जनजागृती करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्राथमिक आरोग्यकेंद्र,पणदरे,बारामती येथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणार्या नागरीकांना डेंग्यू आजाराबबतची माहिती पत्रके वाटण्यात आली.यावेळी डेंग्यू आजार कसा होतो? कसा पसरतो? कोरोना आजारा इतकाच डेंग्यूही धोकादायक आहे.त्यामुळे कोरोना बाबत घेण्यात येणार्या काळजी सोबतच डेंग्यू आजाराबाबत ही दक्षता घ्यावयास हवी,डेंग्यू व चिकुनगुणीया तो आजार होऊ नये यासाठी नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.चैतन्य एजगर यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तेजस्वी पोळ व मलेरिया आरोग्य सहाय्यक बी.जी.कांबळे यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी औषध निर्माण अधिकारी रोहिणी बालगुडे,आरोग्य सहायिका चैत्राली भैरवकर,गीता काळे,एस जाधव,सागर सस्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this: