धक्कादायक ; दारूच्या नशेत मित्राने मिञाचा डोक्यात दगड घालून केला खून

पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात दारू पिताना झालेल्या भांडणातून मित्राने मिञाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . ही घटना आज रविवार( दि . 17 ) रोजी दुपारी पिंपळे गुरव सांगवी येथे घडली आहे . त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष कुलकर्णी ( वय 44 , रा . पिंपळे गुरव ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत संतोष आणि त्याचे मित्र सांगवीतील पिंपळे गुरव परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून दारू पिण्यास बसत होते . तसेच त्यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडणही झाले होते . रविवारी दुपारी ते पुन्हा दारू पिण्यासाठी बसले असता त्यांच्यात पुन्हा भांडण झाले .दारुच्या नशेत असलेल्या या भांडणात संतोष याच्या मित्रांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला . त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले . अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत .

Share this: