Videoक्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :पिंपरीतील आंबेडकर चौकात पीकअप आणि स्विफ्ट गाडीचा विचित्र अपघात;एक महिला जागीच ठार

पिंपरी(वास्तव संघर्ष)पिंपरी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पीकअप व स्विफ्ट डिझायरचा विचित्र अपघात झाला. आज रविवार (दि.24) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मुत्यू झाला आहे आणि अन्य जखमींना पिंपरीतील डॉ डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामध्ये टेम्पो बीआरटी मार्गाच्या दुभाजकावर गेला असून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळली आहे . दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . मयत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत . पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share this: