चिखलीतील घरकुल परीसरात चार ते पाच जणांकडून होमगार्डला मारहाण

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात एका होमगार्डला काही दारु पिणा-या तरुणांनी मारहाण केली आहे. ही घटना घरकुल चिखली परिसरात आज रविवार (दि.24) रोजी दुपारच्या सुमारास घडली . याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चिखलीतील घरकुल परीसरात काही मद्यपान केलेले तरूण एका दुकानांसमोर वाद घालून गोंधळ घालत होते. यावेळी तेथे गोंधळ घालणाऱ्या तरुणाला होमगार्डने रोखले. त्यामुळे एका मद्यपीने त्या होमगार्डला शिवीगाळ केली. यावरून त्याच्या चार पाच साथीदारांनी होमगार्डला मारहाण केली. सबंधित तरुणाविरूध्द चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share this: