आनंदनगरमधील नागरिकांच्या क्वारंटान्टाईनला विरोध; दोन नगरसेवकांना पोलिसांची नोटीस

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या चिंचवडस्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांच्या निगडी प्राधिकरणातील पीसीसीओईतील पालिकेच्या विलगीकरणास (क्वारंटाईन) सुरवात झाली आहे.

निगडी-प्राधिकरण हा शहराचा ग्रीन झोन आहे.तेथे कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तर,आनंदनगर हा नव्याने हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे तेथील कोरोना संशयितांना पालिकेने प्राधिकरणात क्वारंटाईन केले आहे. त्याला नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला होता . यामुळे आज ( दि .26 ) दोन नगरसेवकसहीत अजून दोघांना आज पोलिसांनी नोटीस बजावली आहे .

नगरसेवक शरद दत्ताराम मिसाळ उर्फ राजू मिसाळ , नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्यासह योगेश बाळकृष्ण जाधव , निलेश अनिल जांभळे अशी नोटीस बजावण्यात आलेल्यांची नावे आहेत . पोलिसांकडून फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 149 अन्वये नगरसेवकांना नोटीस देण्यात आली आहे .

निगडी प्राधिकारणात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे . निगडी प्राधिकरण परिसरात कोरोनाबधित नागरिक सापडल्यास त्यांना पीसीसीओई किंवा इथल्याच भागात आयसोलेट करावे . तसेच जिथल्या तिथे सोय करता येत नसेल तर गहुंजे स्टेडियम प्रशासनाने ताब्यात घेऊन तिथे अनेकांची सोय होऊ शकते . प्रशासनाने आयसोलेट केलेल्या नागरिकांना चहा , नाश्त्याची व्यवस्था आम्ही केली होती .

त्यामुळे माणूस म्हणून आमचा त्याला विरोध नाही . ज्या परिसरातील कोरोनाबधित नागरिक आहेत . त्यांची तिथल्याच परिसरात सोय करावी . ते प्रशासनाला सोयीचे होईल.जे 14 नागरिक आयसोलेट केले होते , त्यातील तिघांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे . त्यामुळे त्याचा निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांना धोका संभावू शकतो , असे स्थानिक नगरसेवकांचे म्हणणे आहे .

Share this: