त्याने फेसबुकवर उघडले ‘सैराट’मधल्या परश्याच्या नावाने अकाऊंट;महिलेचे ५ तोळ्यांचे दागिने केले लंपास

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने नगरमधील महिलेशी मैत्री करुन तिचे ५ तोळ्यांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सैराट चिञपटातील आकाश ठोसर ( परशा ) या अभिनेत्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन एका महिलेची फसवणूक केली आहे. शिवदर्शन ऊर्फ शिवतेज नेताजी चव्हाण ( वय २५ , रा . मोहननगर , आर्केड सोसायटी , पिंपरी ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे .

सविस्तर वृत्त असे की, चव्हाण याने वर्षभरापूर्वी फेसबुकवर सैराट फेम आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले होते .तो या महिलेशी वारंवार चॅटिंग करत होता. चव्हाण याने महिलेशी संवाद वाढून तीच्याशी मैञी केली नंतर मैञीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर महिलेला चव्हाण म्हणाला माझी आई आजारी आहे, मला पैशाची गरज आहे, आईला पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल केले आहे. त्यावेळी महिलेने आपल्याकडे पैसे नाहीत , पण दागिने आहेत . हे घेऊन तू आईवर उपचार कर , असे सांगितले .

त्यावर चव्हाण याने मी आईला सोडून येऊ शकत नाही . मित्राला पाठवितो , असे या महिलेला सांगितले . त्यानंतर मित्र म्हणून तो स्वत : च गेला . त्याने या महिलेकडून ५ तोळ्याचे दागिने घेतले . दागिने मिळाल्यानंतर त्याने या महिलेला फेसबुकवरुन ब्लॉक करुन टाकले . त्यानंतर या महिलेला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले . तिने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . त्याचा तांत्रिक तपास करुन पोलिसांनी पुण्यातून शिवदर्शन चव्हाण याला ताब्यात घेतले . त्याच्याकडून या महिलेचे दागिनेही हस्तगत केले आहेत .या चव्हाणने आणखीही काही जणींची फसवणुक केली असल्याचा संशय आहे .अधिक तपास पोलीस करत आहेत

Share this: