आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

माजी महापौर योगेश बहल यांचा उपक्रम; प्रभागातील नागरिकांसाठी अन्नधान्य, हेल्थकीट, व “आर्सेनिक अलब 30” गोळ्यांचे मोफत वाटप

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शहर सध्या कोरोना व्हायरसच्या संकटात सापडले आहे. या संकटात सर्वात जास्त हाल झाले ते ज्यांचे हातावर पोट आहे अशा घटकांवर झाला, सर्वांच्यावर रोजगार नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली.

अशा कोरोना संकटात सापडलेल्या गरजु नागरिकांना माजी महापौर श्री योगेश बहल व मित्र परिवार यांच्या वतीने प्रशासनाचे सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून प्रभागात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सुमारे 4 हजार घरांमध्ये अन्नधान्य पॅकेटचे वाटप करण्यात आले, तसेच 15 हजार घरांमध्ये health kit (1सॅनिटायजर बॉटल, 5 मास्क, 1 डेटॉल साबण, व्हिटॅमिन C संत्री) असे हेल्थ किट चे वाटप करण्यात आले, तसेच संपूर्ण प्रभागामध्ये घरो घरी दारोदारी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक ओषध फवारणी करण्यात आली.

तसेच नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवी म्हणून Arsenic Alb 30 हे होमिओपॅथीक औषध संपूर्ण प्रभागात आत्तापर्यंत 11,000 औषधांच्या गोळ्या घरपोच वाटण्यात आले. कोरोना च्या संकटात योगेशजी बहल हे लोकांच्या सेवेत नेहमीच तत्पर राहिले आहेत, नागरिकांच्या अडी अडचणी मध्ये मदत करत आहेत व त्यांनी लोकांना आवाहन देखील केले आहे की ज्यांना कोणाला कोणतीही अडचण समस्या असेल तर सांगावे तुम्हाला मदत केली जाईल असे आवाहन करण्यात आले आहे.

Share this: