गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना मिञांनी मिळून केली धान्यांची मदत ;त्यात दत्ताकाका साने यांची त्यांना साथ 

पिंपरी (वास्तव संघर्ष) संपूर्ण देश सध्या करोनाच्या संकटाशी लढतो आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक दिवशी करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. काही रुग्णांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांत करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता 5.0 लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. या काळात पोलिस यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी हे दिवस रात्र मेहनत करत आहेत.

मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना उपासमारीची वेळ आली होती. रेशनिंग दुकानदारांनी गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना धान्य द्यावे यावर वास्तव संघर्ष ने बातमी देखील केली होती.

गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांचे हाल नगरसेवक दत्ताकाका साने यांना समजताच त्यांनी आपला प्रभाग नसतानाही गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना धान्य वाटपासाठी वास्तव संघर्ष संपादक दिपक साबळे यांच्याशी संपर्क साधून धान्य दिले. अशातच स्वखर्चाने नितूल पवार,धुराजी शिंदे, विशाल पवळ, अॅड. मिलिंद कांबळे, कनैहा ओझा, अजय शेरखाने, गणेश अहेर, अब्दुलभाई शेख यांनी मोलाचे सहकार्य करून गहू तांदूळ एकञ करून दिपक साबळे यांना सुपूर्द केले

त्यामुळे आज दिनांक 4 जून 2020 रोजी गांधीनगर झोपडपट्टीतील गोरगरिबांना या मिञांनी मिळून  धान्यांची मदत केली त्यात दत्ताकाका साने याची त्यांना साथ लाभल्याने  गांधीनगरवासियांना रेशनिंग वाटप करण्यात आले .

Share this: