सांगवी परिसरात अनाधिकृत होल्डींगला परवानगी देणाऱ्या अधिका-यांना निलंबित करा- ललित म्हसेकर

पिंपरी (वास्तव संघर्ष) सांगवी परिसरात मोठय़ा प्रमाणावर धोकादायक अनाधिकृत होल्डींग आहेत. अतिशय धोकादायक अनाधिकृत होल्डींग हे आहेत. त्यामुळे या अनधिकृत होर्डिगला परवानगी देणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आकाशचिन्ह विभागातील अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करा. अशी मागणी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभा अध्यक्ष ललित म्हसेकर यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की गेले ६ महीन्यापासून सांगवी परिसरातील धोकादायक अनाधिकृत होल्डींग वर कारवाईची मागणी होत असुन काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांची होल्डीग धारकांबरोबर हात मिळवणी असल्यामुळे कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रशासनाचे लक्ष घालून संबंधित सांगवी परिसरातील धोकादायक अनाधिकृत होल्डींग ला परवानगी देणाऱ्या आकाशचिन्ह विभागातील कर्मचारी यांना निलंबित करा.

Share this: