बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वैफल्यग्रस्त प्रशांत शितोळे यांच्याकडून जागेपणी आणि स्वप्नातही आमदार लक्ष्मण जगताप यांच्याच नावाचा जप; जवाहर ढोरे

पिंपरी (वास्तव संघर्ष ) – सांगवी भागात तीनवेळा निवडून दिलेल्या महिला भिगीनींच्या बचत गटांचे कोट्यवधी पैसे लाटणारे आणि पैसे खाण्यासाठी स्मशानभूमीला सुद्धा न सोडणारे पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना पक्षाने महापालिका निवडणुकीचे तिकीट सुद्धा दिले नाही. एवढेच नाही बहिण आणि वहिनी या नात्यातील फरकही न कळालेल्या शितोळे यांनी स्वतःच्या नात्यातील लोकांनाही लुबाडले आहे. राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत त्यांना बळीचा बकरा बनविला. अशा प्रशांत शितोळे यांनी विरोधकांवर टीका करताना आधी स्वतःच्या पक्षात तरी आपणाला स्थान आहे का?, हे तपासून घ्यावे. राजकारणात काहीच स्थान नसल्यामुळे शितोळे हे वैफल्यग्रस्त होऊन झोपेत, जागे असताना आणि स्वप्नातही ऊठसूठ आमदार लक्ष्मण जगताप यांचेच नाव घेत असतात. आमदार जगताप यांच्या नावाचा सतत जप केल्याने एक ना एक दिवस आपल्याला शहराच्या राजकारणात कोणी ना कोणी गांभीर्याने घेतील असा प्रशांत शितोळे यांच्या मनात आशावाद निर्माण झालेला आहे, अशी उपरोधिक टीका भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य जवाहर ढोरे यांनी केली आहे.

यासंदर्भात भाजयुमोचे प्रदेश सदस्य जवाहर ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना प्रत्येक गोष्टीत राजकारणच दिसते. ते आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर सातत्याने टीका करून कायम प्रसिद्धीझोतात राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु टीका करताना आपली राजकीय योग्यता, उंची आणि स्थान याचे कोणतेही भान शितोळे यांना राहिलेले नाही. मुळात प्रशांत शितोळे यांना ज्या सांगवी भागातील नागरिकांनी सातत्याने महापालिकेत तीनवेळा निवडून दिले, त्या भागात त्यांनी काय दिवे लावले आहेत हे संपूर्ण शहराला माहिती आहे. सांगवी भागातील महिला भगिनींनी मोठ्या आशेने शितोळे यांना महापालिकेत निवडून दिले होते. परंतु, शितोळे यांनी त्याच महिला भगिनींचा विश्वासघात केला. त्या महिला भगिनींचे संसार उघड्यावर आणले. या भागातील महिला बचत गटांचे शितोळे यांनी कोट्यवधी रुपये लाटले त्यांची फसवणूक केली. सत्तेत असताना कशा कशात खावे याचे सुद्धा भान शितोळे यांना राहिले नाही.

अगदी स्मशानभूमीला सुद्धा शितोळे यांनी सोडले नाही. मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या या प्रकारावर जनतेने मतपेटीतून राग व्यक्त केला आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. एवढेच नाही तर बहिण आणि वहिनी या नात्यातील फरकही माहिती नसलेल्या शितोळे यांनी स्वतःच्या नात्यातील लोकांचीही फसवणूक करून लुबाडल्याचे उघड सत्य आहे. स्वतःला फार मोठा राजकारणी समजून शितोळे यांनी लूट करणारी ही सर्व कृत्ये केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला २०१७ च्या महापालिका निवडणुकीत तिकीट द्यावेसे वाटले नाही एवढी प्रशांत शितोळे यांची काळीकुट्ट राजकीय कारकिर्द आहे. त्यांची पक्षातील योग्यता पाहूनच पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. पुढे विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीने प्रशांत शितोळे यांना बळीचा बकरा बनविला. तिकीट देऊन अर्ज भरायला लावले आणि नंतर माघार घ्यायला लावून अपमानित करून कायमचे घरी बसविले. अशा प्रशांत शितोळे यांनी विरोधकांवर टीका करताना आधी स्वतःच्या पक्षात तरी आपणाला स्थान आहे का? याचे जरा एकांतात बसून आत्मपरीक्षण करावे.

कायमच लाथाडणाऱ्या पक्षाचे एक पद घेऊन प्रशांत शितोळे हे फक्त आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावरच टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. त्यातून आपल्या नावाची शहराच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा होत असल्याच्या आनंदनात ते वावरत आहेत. हे करत असताना ते झोपेत, जागे असताना आणि स्वप्नातही फक्त आमदार लक्ष्मण जगताप यांच्याच नावाचा सतत जप करताना पिंपरी-चिंचवडकर पाहत आहेत. आमदार जगताप यांच्यावर टीका केली की आपल्याला राजकारणात गांभीर्याने घेतील. इतर कोणी नाही किमान आपला पक्ष तरी दखल घेईल, असा समज यांना झालेला आहे. दर पाच वर्षांनी अशी भुक॓नारी कुत्री भरपुर तयार होतात यांच्यासारखे बिनकामाचे आणि कोणतेच राजकीय स्थान नसणारे अनेकजण आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आरडाओरडा आणि आदळआपट करून आपले अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशा लोकांचा नंतर जनता योग्य प्रकारे राजकीय बंदोबस्त करते. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर टीका करणाऱ्या प्रशांत शितोळे यांच्यासारख्या अन्य लोकांनीही आता तरी आपल्यात राजकीय सुधारणा करावी, असा सल्ला जवाहर ढोरे यांनी दिला आहे.”

Share this: