क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रेम प्रकरणातून पिंपरी चिंचवड येथील बौद्ध तरुणाचा खून;आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

विराज जगताप खून खटला जलदगती न्यायालयात चालवावा; सुरेश निकाळजे

पिंपरी (वास्तव संघर्ष) :-पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथील बौध्द तरुण विराज जगताप यांचा खून करणाऱ्या जातीवादी गावगुंडांवर कडक कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर मधील २० वर्षीय बौध्द तरुण विराज जगताप यांचे प्रेम एका सवर्ण मुलीशी असल्याने त्या मुलीच्या वडिलांनी व इतर ७ ते ८ नातेवाईकांनी जातीयद्वेषातून विराज जगताप या बौद्ध तरुणाचा खून केला आहे. त्यामुळे तेथील बौद्ध वस्तीतील वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे पिंपळे सौदागर येथील जगताप नगर ला पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी जगताप कुटुंबियांना कायमस्वरूपी पोलीस स्वरंक्षण देण्यात यावे.

विराज जगताप खून प्रकरणात मर्डर स्पॉट वरील सर्व खाजगी cctv फुटेज जबरदस्ती डिलिट करण्यास भाग पाडणाऱ्या नगरसेवकास सदर गुन्ह्यात सहआरोपी करावे.  हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. आरोपींना फाशी ची शिक्षा व्हावी.उशिरा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.  अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरेश शांताराम निकाळजे, बाळासाहेब भागवत, संतोष निसर्गगंध, अलोक जगताप, अनिता सावळे उपस्थित होते.

Share this: