नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून त्याला बळी पडू नये; लाॅकडाऊन वाढणार नाही

वास्तव संघर्ष आॅनलाईन – गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा 15 जून पासून लॉकडाऊन जाहीर करणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या जात आहेत . या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे . लाॅकडाऊन पुन्हा वाढणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . मात्र गर्दी न करता शासनाच्या नियमाचे पालन करावे असे जनतेला त्यांनी आवाहन केले आहे.

लाॅकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही . मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका . शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या , असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे .

ठाकरे सरकारच्या ‘ पुनश्च हरि ओम ‘ अर्थात ‘ मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पाही सुरू झाला आहे . कंटेन्मेंट झोन वगळता सर्वत्र पहिल्या आणि दुसऱ्या टाण्यात मिळालेल्या सवलती तिस – या टप्प्यात कायम राहतील . असे सांगण्यात आले आहे. मात्र आता नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता त्याला बळी न पडता आता लाॅकडाऊन वाढणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

Share this: