जो वकिल पाहीजे तो वकिल सरकार देईल ;विराज जगताप यांच्या कुटुंबीयांना अजित पवार यांचे आश्वासन

पिंपरी (वास्तव संघर्ष) – महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे , अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विराज जगताप यांच्या कुटुंबीयांना दिली . रविवारी ( दि . १४ ) दुपारी पवार यांनी पिंपळे सौदागर येथे जाऊन विराजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले . प्रेमप्रकरणातून विराजचा ७ जून रोजी सहा जणांनी खून केला . या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली होती .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील , विरोधी पक्षनेते नाना काटे , अशोक बँकेचे अशोक शीलवंत यावेळी उपस्थित होते .

रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विराजच्या कुटुंबीयांची भेट घेतली . या वेळी पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासाबाबत माहिती घेतली . विराज याच्या कुटुंबीयांनीही पोलीस तपासाबाबत समाधानी असल्याचे पवार यांना सांगितले . आपण पोलीस आयुक्त यांच्याशी तपासाबाबत बोललो आहे . तपास योग्य दिशेने सुरू आहे .

विराज यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी कोणता वकील पाहिजे , अशी विचारणा पवार यांनी जगताप कुटुंबीयांकडे केली . आपल्याला पाहिजे असलेल्या काही वकिलांची नावे द्या शासन तो वकील आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल , असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले . रविवारी सकाळी पिंपळे सौदागरमधील ग्रामस्थांची एक बैठक झाली . आमच्या गावात कोणताही जातीय तणाव नाही , असे जगताप कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री पवार यांना सांगितले .

Share this: