चिंताजनक ;पिंपरी चिंचवड शहरात एकाच दिवशी आढळले 101 कोरोना बाधित रूग्ण ;रूग्ण संख्या पोहचली १४७४ वर

पिंपरी ( वास्तव संघर्ष ) पिंपरी – चिंचवड शहरातील करोना बाधितांच्या संख्येने गुरुवार ( दि . १८ )रोजी एक हजाराच्यावर संख्या ओलांडली आहे . कोरोना व्हायरस बाधितांची संख्या १४७४ वर पोहचली . आज दिवसभरात 101 जणांना बाधा झाली आहे . मृत व्यक्तिमध्ये तिघांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार शहरातील आज करोना बाधित आलेले शहरातील १०१ रूग्ण हे आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पिंपरी, हिंदचौक पिंपळे निलख, शिवतीर्थ काळेवाडी, मोरेवस्ती चिखली, मोरवाडी, खंडोबामाळ, तानाजीनगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, पिंपळे सौदागर, विद्यानगर चिंचवड, नवी सांगवी, पंचतारानगर आकुर्डी, भाटनगर, इंदिरानगर चिंचवड, आंबेडकरनगर पिंपरी, दत्तनगर चिंचवड, घरकुल चिखली, गांधीनगर पिंपरी, दापोडी, तुळजाभवानी कॉलनी थेरगाव, शिवशक्ती चौक भोसरी, वैभवनगर पिंपरी, नाशिक फाटा कासारवाडी, सोनगिरा विहार काळेवाडी, बौध्दनगर पिंपरी, जगताप डेअरी, बिजलीनगर चिंचवड, उद्यमनगर ‍पिंपरी, तापकीर चौक काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, विनायकनगर पिंपळे गुरव, यमुनानगर,कोकणेनगर, गवळीमाथा भोसरी, संभाजीनगर चिंचवड, मिलिंद नगर पिंपरी, गणेशनगर थेरगांव, मोरेवस्ती चिखली, कोंढवा, येरवडा, कान्हे, बोपोडी, हिंजवडी, सिंहगड रोड व देहूरोड येथील रहिवासी आहेत.

आज मृत झालेले रुग्ण गुलाबनगर दापोडी (पुरुष, वय ६५ वर्षें), दिघी (पुरुष, वय ४३ वर्षें), शिरपुर धुळे (पुरुष, वय-६६ वर्षे) येथील रहिवासी आहे.

आज नढेनगर काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, केशवनगर चिंचवड, शाहुनगर, चिंचवड स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, सिध्दार्थ नगर दापोडी, विजयनगर काळेवाडी, आनंदनगर, माऊली चौक वाकड, दत्तनगर दिघी, शिवतिर्थ नगर काळेवाडी, चिखली, दिघीरोड भोसरी, वाल्हेकरवाडी, भीमनगर पिंपरी, साईबाबा नगर चिंचवड, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, गुलाबनगर दापोडी, गांधीनगर खराळवाडी, धनगर बाबा मंदीर रहाटणी,पिंपरी, दत्त मंदिर वाकड, नाणेकर चाळ पिंपरी, पिंपळे सौदागर, काटेनगर दापोडी, बेलठीका नगर थेरगाव, एम.बी.कॅम्प किवळे, चाकण, खडकी, ठाणे, सिंडगडरोड येथील रहिवासी असलेले रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान ०१ तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this: