प्रियकराने धोका दिला म्हणून प्रियसीने केली गळफास घेऊन आत्महत्या ;भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष)-पिंपरी-चिंचवड भोसरी परिसरात राहणाऱ्या एका तरूणीने प्रियकराने धोका दिला म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृत तरुणीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार किरण पांडुरंग पवार (रा. शळद, ता. बाळापूर, जि. अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किरण पवार याने फिर्यादीच्या मुलीसोबत मंदिरात लग्न केले. लग्न झालेले असताना देखील आरोपीने स्वतःचे दुसरे लग्न ठरवले. दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्नाला नकार दिला. प्रेमात झालेली फसवणूक सहन न झाल्याने फिर्यादीच्या मुलीने 9 जून रोजी बोऱ्हाडेवाडी मोशी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Share this: