सोशलमिडीयावर मैञी करून तरूणीवर वारंवार बलात्कार ;भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) फेसबुक या सोशल मीडियावर मैञी करून एका तरुणीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे . याबाबत पीडित तरुणीने तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला आहे .

प्रसाद महेश कवडे ( वय 25 , रा . दापोडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे . याप्रकरणी 23 वर्षीय पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , हा प्रकार 14 फेब्रुवारी 2018 आणि 25 मे 2020 या कालावधीत आरोपीच्या दापोडी येथील घरी , मित्राच्या घरी आणि वेगवेगळ्या हॉटेल्सवर घडला आहे . आरोपीने पीडित तरुणीला सोशल मीडियावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली . त्यावरून तरुणीशी जवळीक साधली . आरोपीने त्याच्या दापोडी येथील घरी पीडित तरुणीला बोलावले . तिला लग्नाचे अमिश दाखवून तरुणीच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध प्रस्थापित केला .

त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीला वारंवार स्वतःच्या घरी , मित्राच्या घरी आणि वेगवेगळ्या हॉटेल्सवर नेऊन पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केला . दरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिली . आरोपीने तिच्या संमतीशिवाय तिचा गर्भपात केला . पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली . याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत तरुणावर बलात्कार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला . भोसरी पोलीस अधीक तपास करीत आहेत .

Share this: