माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी विवाहीतेचा शारीरिक छळ;निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात सासरच्यांकडून फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहीत महीलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. याबाबत विवाहितेने पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.

याप्रकरणी पती, सासू, सासरे, नणंद, नंदावा, मावस सासू या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 23 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सप्टेंबर 2018 ते 9 ऑक्टोबर 2019 या कालावधीत घडला. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना रावेत मंगलविश्व येथे बुक केलेला फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली.विवाहितेने दहा लाख रुपये आणले नाहीत, म्हणून विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करून स्कार्फने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपी सासऱ्याने विवाहितेशी गैरवर्तन करून विवाहितेचा विनयभंग केला. अन्य आरोपींनी विवाहितेला माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेला शिवीगाळ करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत

Share this: