तमाशा कलावंतांना शासनाने तातडीने पाच हजाराची आर्थिक मदत करावी- रामदास आठवले

मुंबई (वास्तव संघर्ष) – तमाशा कलावंत ;लोककलावंत आंबेडकरी लोकशाहीर या सर्व लोककलावंतांना लॉकडाऊन च्या काळात प्रचंड आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे .अनेक कलावंत उपाशीपोटी राहत आहेत या सर्व कलावंतांना महाराष्ट्र शासनाने तातडीने पाच हजाराची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले आहे. या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले असल्याची माहिती नामदार रामदास आठवले यांनी दिली आहे.

कोरोनाच्या च्या संकटात जनजीवन वाचविण्यासाठी दळणवळण बंद करण्याचा टाळेबंदीचा निर्णय सरकारने घेतला. या तीन महिन्याच्या काळात उद्योग बंद असल्याने मजुरां प्रमाणे लोककलावंत यांचेही हाल झालेले आहेत या सर्व लोककलावंतांना राज्य शासनाने किमान पाच हजाराची तातडीची मदत द्यावी यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण संपर्क साधणार असल्याचे नामदार रामदास आठवले यांनी कळविले आहे

Share this: