बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कौतुकास्पद :तब्बल तीन महिने महिलेचा शोध घेऊन खान आणि शेख यांनी हरवलेली मौल्यवान वस्तू महिलेला केली परत

भोसरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड येथील भोसरीत एका महिलेची पर्स पिंपळे गुरवमध्ये प्रवास करताना 21 मार्च 2020 रोजी सायंकाळच्या वेळी रस्त्यावर पडली. त्या पर्समध्ये पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे गठंण होते. ही पर्स पिंपळे गुरव येथील रहिवासी नासिर खान आणि ताहीर शेख यांना. सापडली

नासिर खान आणि ताहीर शेख यांना पर्समध्ये भोसरीतील समता विकास मंडळाच्या गणेश मंदिराला दिलेल्या देणगीची पावती सापडली. खान आणि शेख यांनी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधला. मंडळाने सूचना फलकावर पर्स मिळाल्याचे लिहून संबंधितांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले. मात्र संपर्क होऊ न शकल्याने पर्सची पाहणी केली असता पर्समध्ये सोने खरेदी केल्याची पावती सापडली. मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत सोन्याच्या दुकानाशी संपर्क साधल्यावर त्या महिलेचे नाव शकुंतला बलभीम भानवसे (वय ५३.रा. लांडेवाडी, भोसरी) असल्याचे समजले.

सोनाराकडून त्या महिलेचा दूरध्वनी क्रमांक मिळवून मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी शुकुंतला यांच्याशी सपर्क साधला. तब्बल तीन महीने शकुंतला यांचा शोध घेऊन रविवारी (ता. २१) त्यांची सोन्याच्या ऐवजासह रोख रक्कम असलेली पर्स सुपुर्द करण्यात आली. या वेळी नासीर खान, ताहेर शेख, मंदिराचे अध्यक्ष रामदास जाधव, बाळासाहेब म्हस्के, कैलास गोरडे, अरुण चव्हाण, शशीकांत गुजर, श्रीपाल ज्वेलर्सचे ओंकार, संपत वाबळे, अनवर सय्यद, गिरीश वाघमारे, शरद खोपडे आदी उपस्थित होते

शकुंतला यांनी भिशी लावून त्यांनी थोडे-थोडे पैसे जमा करून सोन्याचे गंठण घेतले होते. हे गंठण त्या सांगवीमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीकडे सुरक्षीत ठेवण्यासाठी २१ मार्च 2020 रोजी निघाल्या होत्या. मात्र पर्समध्ये ठेवलेले गंठण पिंपळे गुरवमध्ये पडले. व त्या नैराश्यात गेल्या होत्या. मात्र सोन्याचे गंठण पुन्हा मिळाल्याने शकुंतला बाईच्या चेहऱ्यावरून आनंद स्पष्टपणे दिसत होता. खान आणि शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

Share this: