कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रांगणात असलेल्या कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते- विठ्ठल उर्फ नाना काटे, महिलाअध्यक्ष वैशालीताई काळभोर, युवक अध्यक्ष – विशाल वाडकर,युवती अध्यक्ष – वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष – विनोद कांबळे, सेवादल अध्यक्ष-महेश झपके आदि उपस्थित होते

Share this: