कोरोना व्हायरस ;पिंपरी चिंचवडच्या या जेष्ठ नगरसेवकासाठी नागरिकांचे ईश्वराला साकडे

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी विरोधी पक्षनेता व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेवक यांना कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. मात्र त्यांच्या पुतण्याच्या वडीलांना ताप आल्यावर त्यांनी खाजगी दवाखान्यामध्ये कोरोना टेस्ट केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक त्यांच्या संपर्कात आल्याने प्रकृति अस्वस्थेमुळे त्यांनी स्वताहून खाजगी दवाखान्यामध्ये आपली कोरोना टेस्ट करून घेतली घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवडच्या या नगरसेवकांसाठी नागरिकांचे ईश्वराला साकडे ….

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक असलेल्या आपल्या नगरसेवकास कोरोना व्हायरस पाॅझिटिव्ह आल्याने शहरभरातून या नगरसेवकांसाठी ईश्वराला साकडे घालण्यात येत आहे. सामान्य जनतेसाठी असलेल्या तळमळीतून आपल्या प्रभागातील कुणीही नागरिक उपाशी राहता कामा नये या भावनेतून त्यांनी लोकांसाठी अहोरात्र परिश्रम घेत अन्नधान्याची मदत केली आहे.

जनसामान्यांची सेवा करत असताना घर आणि संसाराची पर्वा न करता लॉकडाऊन काळात अनेकांना अन्नछत्र चालवून कुणीही आपल्या भागात उपाशी राहू नये म्हणून त्यांनी जीवाचे रान केले.
प्रभागात ज्यावेळी कोरोना चे रुग्ण आढळून येत होते अशावेळी कुणीही पुढे यायला धजावत नव्हते.पण त्यांनी आपल्या जनतेच्या सुख दुःखात कायम सोबत आहेत आणि अशा कठीण काळातही नागरिकांना धाडस देत राहिले.

पायाला जशी भिंगरी लावलेली असते तसे ते या अशा भयंकर त्रासदी काळातही कायम जनतेमध्ये होते.अनेक त्यांचे समर्थकही त्यांना बाहेर फिरू नका म्हणून सांगत होते. पण त्यांनी आपल्या स्वतःची फिकीर कधी केली नाही आणि परमेश्वर माझ्या जनतेच्या हृदयात आहे आणि त्याची सेवा ही त्या ईश्वराची सेवा आहे या भावनेने जनतेच्या सुखदुःखात सोबत राहिले.

या जेष्ठ नगरसेवकाला कोरोना झाल्याचे कळताच अनेक जणांना गहिवरून आले आणि अशा देवतुल्य व्यक्तिमत्त्वाचे कोरोना देखील काहीही बिघाडू शकणार नाही अशा भावना जनतेमधून व्यक्त होत आहेत.ते लवकर कोरोना मुक्त व्हावेत म्हणून अनेक नागरिकांनी देवाला साकडे घातले आहे. आणि इतक्या सरळ साध्या मनाच्या ऋषी मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीला लवकर बाहेर पडण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना चिखली-भोसरी प्रभागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share this: