लग्नांचे अमिष दाखवून तरुणीवर केला वारंवार बलात्कार ;संगणक अभियंत्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडीत आयटी कंपनीत एकञ कामाला असताना झालेल्या प्रेमप्रकरणातून लग्नाचे आमिष दाखवत संगणक अभियंताने तरुणीवर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी २९ वर्षीय पीडित तरूणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अभिलाष अंबरनाथ शिवनगर (वय 27, रा. सेवादलनगर, नागपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहे. ही घटना 21 सप्टेंबर 2019 ते 22 मार्च 2020 दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी अभिलाष हे दोघेही संगणक अभियंता असून हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकाच कंपनीत नोकरीला आहेत. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. अभिलाष याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले.तसेच महाबळेश्वर येथील लॉजवर तसेच वाकड येथे ठिकठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. यानंतर तरुणीने अभिलाष याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच परत फोन करु नको, अशी धमकी दिली. यावर पीडितेने वाकड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत .

Share this: