दररोज सॅनिटायझर वापरले मास्क घातला तरीही.. पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आणि अधिका-यांना झाला कोरोना

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर झाला आहे आज दिवसभरात १५७ पाॅझिटिव्ह कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. दररोज हाच आकडा महापालिकेच्या वतीने येत आहे दीडशेहून अधिक व्यक्तींना संसर्ग होतो आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २७२२ वर पोहचली आहे. मृत संख्या ७१ वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य व वैद्यकीय विभाग कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहे. मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू आहे. गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही लोक ऐकत नाहीत. ‘काय होतंय?’ किंवा ‘काही होत नाही’ अशा आविर्भावात अनेक जण फिरताना दिसत आहेत. अशा व्यक्तींनी महापालिका कर्मचारी, अधिकारी यांचा आकडा बघावा की ज्यांनी कोरोना होऊ नये, यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली तरीही त्यांना संसर्ग झाला आहे.

महापालिका सेवेतील पंचवीस जणांना कोरोना संसर्ग झालेल्या बाब उघडकीस आली आहे . संसर्ग झालेल्यांमध्ये वायसीएमचे एक डॉक्टर आहेत. दोन नर्स आहेत. दोन वॉर्डबॉय आहेत. काही सफाई कर्मचारी आहेत. एक उपअभियंता आहेत. एक कनिष्ठ अभियंता आहेत. इतरांमध्ये महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील काही कर्मचारी आहेत. ते वेळोवेळी सॅनिटायझर वापरत होते. वेळोवेळी हात धुत होते. मास्क वापरत होते. प्रसंगी ग्लोज वापरत होते. डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय तर पीपीई किट वापरत होते. तरीही त्यांना कोरोनाने गाठले आहे. या वरून त्याचे गांभीर्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. कोरोनापासून चार हात लांब राहण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळायला हवे. मास्क नियमितपणे वापरातला हवे. तरच आपण सुरक्षित राहू शकतो अन्यथा कोरोनाचे शिकार व्हायला वेळ लागणार नाही.

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे केशवनगर कासारवाडी, पिंपळे सौदागर, विकासनगर देहुरोड, गवळीनगर भोसरी, गणेशनगर डांगे चौक, आदर्शनगर पिंपरी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, आकुर्डी, नेहरुनगर पिंपरी, लांडेवाडी भोसरी, विठ्ठलनगर पिंपरी, दळवीनगर, महात्मा फुलेनगर भोसरी, काशिद पार्क पिंपळे गुरव, डिलक्स चौक पिंपरी, शगुन चौक पिंपरी, संत तुकारामनगर भोसरी, रिव्हर रोड पिंपरी, कुदळे चाळ पिंपरी, नव महाराष्ट्र विद्यालय पिंपरी, बौध्दविहार पिंपरी, मिलिंद नगर पिंपरी, कैलासनगर थेरगाव, महाराष्ट्र कॉलनी पिंपळे गुरव, मंगलनगर वाकड, भाटनगर पिंपरी, सुभाष नगर पिंपरी, वालकन सोसायटी पिंपळे निलख, गुलाबनगर पिंपरी, तानाजीनगर चिंचवड, विजय अपार्टमेंट ‍पिंपरीगाव, गणेशनगर भोसरी, पाटीलनगर चिखली, दिघीरोड भोसरी, वैभवनगर पिंपरी, तापकीरनगर काळेवाडी, रंजक कॉलनी, इंद्रायणीनगर भोसरी, गणेशनगर दिघी,

रुपीनगर निगडी, बापुजी बुवामंदिर पिंपळे गुरव, इंदिरानगर चिंचवड स्टेशन, आदर्शनगर काळेवाडी, भारत मातानगर दिघी, इंदिरानगर चिंचवड, संभाजीनगर, यमुनानगर ‍निगडी, जयगणेश साम्राज्य भोसरी, सुदर्शनगर चिखली, भारतमाता हौ. सो. वाल्हेकरवाडी, ‍चिखली, शाहुनगर चिंचवड, पटेलगार्डन जुनी सांगवी, किर्ती हॉस्पिटल जवळ पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, कोकणेनगर काळेवाडी, वाकड, शिवाजीवाडी मोशी, कुदळे चाळ पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर चिंचवड, शास्त्रीनगर पिंपरी, दापोडी, वसंतदादा पाटील नेहरुनगर, वाल्हेकरवाडी, नढेनगर, काळेवाडी, नंदनवन कॉलनी भोसरी, नंम्रता कॉलनी थेरगाव, जवळकर चाळ कासारवाडी, हिराबाई झोपडपट्टी कासारवाडी, चिकन चौक निगडी, बौध्दनगर, आनंद विहार रावेत, हडपसर, मंगळवार पेठ, चाकण, कोंढवा, जुन्नर येथील रहिवासी आहेत.

आज मृत झालेले रुग्ण विशालनगर, पिंपरी (पुरुष, वय- ६०वर्षे) येथील रहिवासी आहे.

Share this: