क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

इमारतीच्या टेरेसवर बोलावून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील एका अल्पवयीन मुलीला इमारतीच्या टेरेसवर बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 8 जून ते 28 जून या कालावधीत चिंचवड येथे घडली.

वृषभ नंदू जाधव (वय 19, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या पालकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी अल्पवयीन आहे. आरोपीने त्याचा वाढदिवस असल्याचे कारण सांगून मुलीला तो राहत असेलल्या इमारतीच्या टेरेसवर बोलावून घेतले.तिथे तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने पीडीत मुलीला मोबईल फोन वापरायला दिला. फोन करून मुलीला गच्चीवर बोलावून वारंवार आरोपीने मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत

Share this: