गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जवळ बाळगणारा अडकला सांगवी पोलीसांच्या जाळयात

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. विक्या घिसाडी उर्फ विकास बबन पवार( वय- ३८ वर्षे , रा – शिवशक्ती तरुण मंडळ , रेल्वे लाईन जवळ , दापोडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार रोहीदास
बो -हाडे , यांना त्यांचे खब – याकडुन गोपनिय खबर मिळाली की आज सोमवार दिनांक २९ रोजी सकाळी ०७:१५ वा चोंधे लॉन्स , नदीचे पुलाजवळ , विशालनगर , पुणे येथे एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने आरोपीला येथे कशासाठी आला आहे असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला व त्याचे हातात असलेल्या कापडी पिशवीत काय आहे असे विचारले असता त्याने सदर पिशवी त्याचे मागे लपविण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी रोहीदास बो – हाडे यांनी सदर संशयीत इसमाचे हातातील कापडी पिशवी घेवुन उघडुन पाहीली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा ( रिव्हॉल्वर ) व दोन जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याच्याकडे सदर गावठी कट्टा ( रिव्हॉल्वर ) व दोन काडतुस बाबत विचारपुस केली असता त्याने त्याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देवुन त्याबाबत समाधानकारक खुलासा केला नाही . त्यामुळे त्याने विनापरवाना एक गावठी कट्टा ( रिव्हॉल्वर ) व दोन जिवंत काडतुस जवळ बाळगुन गुन्हा केल्याचे कबूल केले.त्यानुसार रजि.नं. ३२४/२०२० भा.ह.का. कलम ३ ( २५ ) सह महा.पो. अधि . कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे .

सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त – संदीप बिष्णोई , अपर पोलीस आयुक्त- रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त- विनायक ढाकणे , सहा . पोलीस आयुक्त- श्रीधर जाधव ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक . रंगनाथ ऊंडे . , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) स सांगवी पोलीस ठाणे-अजय भोसले , यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग , पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुके , पोना रोहीदास बो-हाडे , पोना कैलास केगले , पोना सोमनाथ असवले , पोशि विनायक देवकर , पोशि शशिकांत देवकांत , पोशि अरुण नरळे , पोशि नितीन खोपकर , पोशि अनिल देवकर , पोशि दिपक पिसे , पोशि हेमंतकुमार गुत्तीकोंडा , यांनी केली आहे .

Share this: