भटकेविमुक्त राज्य समन्वयक समिती वंबआ मा. स्वातीताई कदम यांच्या हस्ते पिं-चि मनपातील अधिका-यांचा कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सत्कार

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहर आषाढी एकादशी आणि वंसतराव नाईकसाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त. अजित पवार,सह.आयुक्त संदीप खोत यांचे समवेत कोविड-१९च्या कालखंडात शहरात युद्ध पातळीवर उभारलेले समन्वयक कक्ष समितीचे आठ आधिकारी यांचे सन्मान पत्र पुष्प व वारकरी पंचा देवुन त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार मा.स्वातीताई कदम यांचाया हस्ते गौरवण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या रुहिनाज शेख, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पानपाटील आणि पञकार – दिपक साबळे यांनाही मा.स्वातीताईकदम यांच्या हस्ते सन्मानपत्र , पुष्प देवुन कोरोना योध्दा पुरस्कार देवुन आज गौरवण्यात आले.

यावेळी स्वातीताई कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कि,त्या म्हणाल्या जगभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाचे थैमान चालु असताना महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहराला देखील या महामारीने विळख्यात घेतले. पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक,आधुनिक शहर आहे यामुळे येथे बाहेरुन येणारा कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो. अशा काळात अचानक झालेल्या लॉकडाऊन मुळे इथल्या नागरिकांमध्ये भययुक्त वातावरण तयार झाले होते.अशातच हातावर पोट असणारे भटकेविमुक्त, कामगार,कष्टकरी, निराधार वर्गासमोर मुलभुत गरजाचा मोठा प्रश्न उभा होता यांत अनेक अडचणीवर मात करत इथला प्रशासनातला अनुभवी अधिकारी वर्ग मोठ्या हिमंतीने या कोविड १९ च्या युद्धजन्य परिस्थितित आपली टिम उभारायला सज्ज झाला.

खरतर कोविड १९ हि यु्दधजन्य परिस्थिति आपणा सर्वानासाठी नवीन संकट होते जे तज्ञाकडुन समजुन घेणं त्यावर दिशा ठरवणं यात वेळ जात होता. दरम्यान इथला वंचित घटकांची आबाळ प्रसारमाध्या द्वारे वा फोन वरुन ऐकुन ,पाहुन आमच्या सारखे शहरातील अनेक पक्ष संघटनेचे संवेदनशील कार्यकते अस्वस्थ होते ते प्रशासन वा तज्ञाच्या संपर्कात होते.परिस्थिती इतकी विकट होती कि हि लढाई जीवावर उदार होवुन राष्ट्रासाठी जीव ही धोक्यात घालुन हे कोरोना योद्धा युद्धभुमीवर उतरले अनेक योद्ध्यांची प्राणज्योत या युद्धात मावळली . अशा कर्तव्यदक्ष अधिकारयाप्रती भारतीय नागरिक म्हणुन कृतज्ञता व्यक्त करताना आम्हाला अभिमान वाटतो.

Share this: