आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व पक्षांनी कोरोनाला रोखण्यासाठी एकञ काम करायला पाहिजे – संजोग वाघेरे पाटील

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या पाहता महानगरपालिकेचे प्रशासन व प्रशासनावर ज्यांची सत्ता आहे असे सर्व लोकप्रतिनिधी अशा काळामध्ये नागरिकांच्या आजच्या कोरोना मुळे झालेल्या भयानक परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आवश्यक सुविधा पुरवण्यात कमी पडत आहेत हे स्पष्टपणे दिसते. शहर म्हणून शहराचा विकास आज ना उद्या आपण सर्वजण करणारच आहोत. परंतु, आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविणे व त्यासाठी असलेल्या या
सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे व त्यासाठी वेळ पडली तर महानगरपालिकेची तीजोरी पूर्णपणे रिकामे करणे यांची मानसिकता आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये दिसून येत नाही. त्यामुळेच सर्व मतभेद बाजूला ठेवून कोरोना सारख्या महामारीला शहरातून रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन काम करायला हवं याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन आज पत्रकार परिषदेत सांगितले .

यावेळी संजोग वाघेरे पाटील, विरोधीपक्षनेते नाना काटे, फजल शेख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वाघेरे म्हणाले, श्रीमंत समजले गेलेल्या महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक रुग्ण नागरिकांना खाजगी व सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा जागा उपलब्ध होत नाहीये हे या शहरातील नागरिकांचे दुर्दैव आहे.त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हजारो रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे या सर्वांवर उपचार करण्यासाठी असणाऱ्या खाजगी रुग्णालये व महानगरपालिकेचे रुग्णालयांची जागा कमी पडत असून अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे व त्याला प्रशासन कमी पडत आहे असे काही ठिकाणी जाणवत आहे.रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्यावर आवश्यक ते उपचार होणे सुद्धा गरजेचे आहे. आयुक्त म्हणून विशेष अधिकारत आम्ही सुचवीत असलेल्या काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करावी व त्यासाठी योग्य निर्णय घेणे व कारवाई करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.

Share this: