क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड येथे नऊ जणांच्या टोळक्याने केला जिम ट्रेनर तरुणाचा खून

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड येथे किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणाच्या रागातून नऊ जणांच्या टोळक्याने मिळून एका जिम ट्रेनर तरुणाचा शस्त्राने वार करून खून केला. ही घटना काल शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास बळवंतनगर, चिंचवडेनगर येथे घडली.

प्रेम सायबू लिंगदाळे (वय 21, रा. चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मॅडी मडिवाल, राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण बाबासाहेब चव्हाण (वय 21, रा. चिंचवडेनगर), योगेश फुरडे, दीपक शरद कोल्हे (वय 29, रा. बिजलीनगर, चिंचवड), सागर परीट, अनंत अजिनाथ साठे (वय 27, रा. चिंचवडेनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंत, दीपक आणि किरण या तिघांना अटक करण्यात आली आहे. शिवानंद शंकर हेळवे (वय 23, रा. चिंचवड) याने या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचा मॅडी मडीयाल यास फिर्यादी व त्याच्या मित्रांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन त्यांच्या रिक्षाचे नुकसान केले होते. त्याचा राग मनात धरुन मॅडी व त्याचे साथीदार मित्र राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण चव्हाण, सागर परीट, दीपक कोल्हे, अनंत साठे यांनी बळवंतनगर, चिचवडेनगर येथील बालाजी निवास समोर प्रेम याच्या डोक्यात कोयते व पालघनने सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यातच प्रेमचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत

Share this: