पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा हाहाकार;573 जणांना आज कोरोनाची लागण

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 573 आणि शहराबाहेरील 8 अशा 581 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 363 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 4861 वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज रुग्णवाढीचा उच्चांक होत आहे. मागील काही दिवसांपासून 300 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. आज तर शहरातील तब्बल 573 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

आज खेड येथील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे वायसीएममध्ये मृत्यू झाला आहे

Share this: