राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दत्ताकाका साने यांच्या घरी सांत्वनपर भेट

पिंपरी (वास्तव संघर्ष) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिवंगत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. दरम्यान, चिखली ग्रामस्थांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

साने कुटुंबातील सदस्य, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल उपस्थित होते. कोरोनामुळे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) बिर्ला हॉस्पीटलमध्ये निधन झाले होते .

Share this: