राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माजी आमदार विलास लांडे यांच्या घरी जाऊन भेट

पिंपरी(वास्तव संघर्ष ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी माजी आमदार विलास लांडे आणि कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. लांडे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. तर काही दिवसांपूर्वी लांडे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे.माजी आमदार विलास लांडे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यावेळी शरद पवार यांनी फोनद्वारे विचारपूस केली होती.

यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल उपस्थित होते

Share this: