मानवता हिताय सोशल फाउंडेशन आणि भरारी फाऊंडेशनच्या वतीने पोलीसांना कोरोना योध्दा पुरस्कार

पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे अख्खे जग हैराण झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजाराला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. शहरातील पोलीस सदरक्षणाय खलनिग्रनाय या ब्रीद वाक्याप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. ख-या अर्थाने शहरातील पोलीस हे कोरोना योध्दा असून त्यांचा मानवता हिताय सोशल फाउंडेशन आणि भरारी फाउंडेशनच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये त्यांना सन्मानपत्र आणि एक ट्राॅफी असा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी, मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष – धनराजसिंग चौधरी म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन आणि वाय. सी. एम हॉस्पिटलने कोरोना काळात स्वताच्या जिवाची पर्वा न करता जनतेच्या हितासाठी केलेल्या उत्कृष्ट, अभिमानास्पद व कौतुकास्पद कामगिरीबद्दल मानवता हिताय सोशल फाउंडेशन, फरारी फाऊंडेशन व आमच्या सर्व माता भगिनींच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करीत सन्मान करण्यात येत असून आम्हाला आपण सर्व पोलीस कर्मचारी , डॉक्टर्स, नर्स व सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे.

यावेळी, मानवता हिताय चे संस्थापक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्षा सौ. स्नेहल दराडे, भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.आशा इंगळे, उद्योजिका सौ. राजश्री गागरे, सौ. तृप्ती रामाने, सौ. क्षमा धुमाळ, वास्तव संघर्ष न्यूजचे संपादक-दिपक साबळे, सामाजिक कार्यकर्ते विशाल पवळ, शिरीष कणसे, सौ. शुभांगी साखपाळ, सौ.प्रियंका हिबारे, ईत्यादी उपस्थित होते

Share this: