लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरच्या अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल

पिंपरी(वास्तव संघर्ष) : लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायर या नवीन लायन्स क्लबची स्थापना करण्यात आली असून सन 2020-21 या वर्षीची नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी भीमसेन अग्रवाल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी राजेश अग्रवाल, सचिव रोहित गुप्ता, कोषाध्यक्ष अशोक बंसल, पीआरओ रवि सातपुते, सल्लागार समिति अध्यक्ष पदी अशोक अग्रवाल यांची नियुक्ती केली गेली.

अध्यक्ष पदी निवड झाल्यावर भीमसेन अग्रवाल म्हणाले कि कोरोना पासुन बचाव करण्यासाठी आम्ही हजारों व्यक्तिंना होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम 30 आणि मास्क चे वितरण केले आहे. लायन्स क्लब च्या माध्यमातून वर्षभर वृक्षारोपण,अंगदान, अन्नदान, रक्तदान, नेत्रदान, पाणी अडवा, पाणी जिरवा,बेटी-बचाओ-बेटी पढाओ, प्रौढ शिक्षण, ग्रामीण विकास सारखे कार्यक्रम लायन्स क्लब चे इंटरनेशनल डायरेक्टर नरेंद्र भंडारी, मल्टीपल काऊंसिल चेअरमन गिरिश मालपानी, माझी डिस्ट्रिक्ट गवर्नर राज मुछाल, डिस्ट्रिक्ट गवर्नर अभय शास्त्री यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राबविण्यात येईल.

Share this: