ज्या अधिका-यांना आयुक्तांनी जबाबदारी सोपविलेली आहे त्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे – महापौर उषा उर्फ माई ढोरे

पिंपरी (वास्तव संघर्ष) – कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण लक्षात घेता ज्या अधिका-यांना आयुक्तांनी जबाबदारी सोपविलेली आहे त्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्ण वाढ होवू नये यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करण्याचे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनास दिले.
आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी, अधिकारी व वैद्यकीय रुग्णालय प्रमुखांची कोरोना विषाणूच्या पाश्वभुमीवर आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य अभिषेक बारणे, सागर आंगोळकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रुग्णालय प्रमुख डॉ. सुनिल जॉन, डॉ. प्रकाश ताडे, डॉ. सुनिता इंजिनियर, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. तृप्ती सांगळे, डॉ. विणादेवी गंभीर, डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. शैलेजा भावसार, डॉ. सुनिता साळवी आदी उपस्थित होते.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढतील याचा अंदाज होता. सद्यस्थितीत कोरोना रुग्ण मोठया संख्येने आढळून येत आहेत. तरी देखिल नागरिकांची मोठया प्रमाणावर शहरात दिसून येत आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी याबाबतीत कठोर उपाय योजना करण्याची गरज असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोनाबाबत माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सारथी हेल्पलाईनमध्ये कोरोना कक्ष चालू करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी सूरु आहे. वैद्यकीय अधिका-यांची कमतरता लक्षात घेता त्यांची भरती करण्यात आलेली आहे. तसेच दहा रुग्णवाहिकांची मागणी देखिल करण्यात आलेली आहे. रुग्ण शोध मोहिम, पाठपुरावा तसेच रुग्णांना समुपदेशन न वैद्यकीय मार्गदर्शन याकरीता ३० मल्टी पर्पज वर्करची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येकाने मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क वापरणे हे एक प्रकारचे लॉकडाऊन सारखेच आहे. यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याकरीता संबंधित अधिका-यांना सूचना देण्यात आल्या असून त्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

प्रतिबंधात्मक क्षेत्र लागू करणे, निरस्त करणेबाबतचे आधिकार सर्व क्षेत्रीय अधिका-यांना देण्यात आले असून संबंधित क्षेत्रातील रुग्णांची वाढ होत असल्यास प्रतिबंधात्मक क्षेत्राचा आवश्यकतेनुसार विस्तार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. कंपन्यांमधील कामगारांमध्ये सूरक्षित अंतर ठेवले जात आहे किंवा नाही याबाबत काही कंपन्यांमध्ये समक्ष पाहणी केली असता तेथे त्रृटी आढळून आल्या आहेत. त्या कंपन्या काही दिवसांसाठी सिल करण्यात आलेल्या आहेत. लॉकडाऊन संबंधी पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर व अन्य पदाधिका-यांशी चर्चा विनिमय करुन पुढील ‍निर्णय घेण्यात येतील असेही ते म्हणाले. पुढील काही दिवसांत कोरोनाचा होणार प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक टप्प्यामध्ये जास्त प्रमाणात नागरिकांच्या संपर्कामध्ये येणारे भाजीपाला, फळे, मांस विक्रेते, घंटागाडी कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हाणाले.

सत्त्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी रुग्णालय प्रमुखांकडुन खाजगी रुग्णालयातील किती बेड हे शासन निर्देशानुसार उपलब्ध आहेत याचा अंदाज घेतला असता बिर्ला रुग्णालयात १५०, लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड येथे १००, ईएसआय हॉस्पिटल येथे १००, निरामय हॉस्पिटल येथे ४०, स्टर्लिंग हॉस्पिटल येथे १००, स्टार हॉस्पिटल येथे ५०, ॲक्वार्ड हॉस्पिटल येथे २००, डि.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे ३०० इतके बेड खाजगी रुग्णालयामध्ये उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रमुखांनी सत्तारुढ पक्षनेत्यांना दिली. तसेच त्यांनी उपस्थित सर्व रुग्णालय प्रमुखांकडून अडीअडचणींबद्दल विचारणा केली. आणि वैद्यकीय प्रमुखांकडून देखिल माहिती जाणून घेतली.

रुग्णवाहिका, डिझेल खरेदी, वैद्यकीय स्टाफ याबाबतील त्यांनी प्रशासनास सूचना केल्या. तसेच खाजगी रुग्णालयात मनपाचा हेल्प डेस्क तातडीने तयार करा. त्या डेस्क द्वारे किती बेड वापरणेत आले व किती बाकी आहेत याचा आढावा त्या डेस्क वर्करद्वारे महापालिकेच्या वार रुमला देणेबाबत सुचनाही त्यांनी केल्या.
उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसदस्य अभिषेक बारणे, सागर आंगोळकर यांनी देखिल आपले मत व्यक्त करुन विविध समस्यांबाबत विचारणा केली. बैठकीस उपस्थित राहिल्याबद्दल मा. महापौर यांनी सर्वांचे आभार मानले.

Share this: