दिवंगत दत्ताकाका यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यात येईल ;मंञी जयंत पाटील यांचे साने कुटुंबास आश्वासन

पिंपरी (वास्तव संघर्ष)पिंपरी चिंचवड शहरातील दिवंगत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या निवासस्थानी आज जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंञी जयंत पाटील यांनी साने कुटुंबायांची सांत्वनपर भेट घेऊन दत्ताकाका यांची आठवणीला उजाळा दिला .

ते म्हणाले, दत्ताकाका सारखा जीवाभावाचा व्यक्ती आज राष्ट्रवादी काँग्रेसने गमाविला. गेल्यावर्षी महाराष्ट्रात पुरस्थितीमुळे दत्ताकाका कोल्हापूर सांगलीला पिंपरी चिंचवड वरून अन्नधान्याच्या गाड्या भरुन आले होते . त्यावेळी आमच्या सोबत सर्वात पुढे दत्ताकाका होते. अगदी पुरग्रस्तांना जेवण वाटण्याचे काम त्यावेळी दत्ताकाका यांनी केले होते. हे मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहीले आहे. दत्ताकाका यांचा मृत्यू संदर्भात ज्या काही गोष्टी आमच्या कानावर येत आहे त्यानुसार त्यांचा मृत्यू जर संशयास्पद असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. असेही पाटील म्हणाले.

यावेळी साने कुटुंबातील सदस्य आणि माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. आज सकाळपासूनच दत्ताकाका साने यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी सांत्वनपर भेट घेतली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, आमदार रोहीत पवार, आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी साने कुटुंबायांची सांत्वनपर भेट घेतली आहे.

Share this: