विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृहा’वर समाजकंटकांनी केला भ्याड हल्ला ;देशभरातून संताप व्यक्त

वास्तव संघर्ष आॅनलाईन मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.भ्याड हल्ला करणा-या समाजकंटक आरोपीला अटक केली नाहीतर जनाक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल.

आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच देशभरातील भीम अनुयायांनी संताप व्यक्त केला आहे.

Share this: