आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक :क्वारंटाइन सेंटरमधील निकृष्ट जेवणाच्या तक्रारीनंतर महापालिकेचा महिलांच्या आरोग्यांशी खेळ

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णांपर्यंत अनेक सोयी सुविधा पोचत नसल्याचे दिसत आहे.
म्हाळुंगे चाकण येथे भोसरी- महात्मा फुलेनगर, परिसरातील काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आले आहेत. यामध्ये लहान मुलांसह महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत. महिलेला मासिक पाळी दरम्यान होणारे आजाराकडे मात्र महापालिकेतील वैद्यकीय महिला अधिकारी लक्ष देताना दिसत नाहीत. यावरून महापालिका प्रशासन महिलेच्या आरोग्यांशी किती खेळ करत आहे हेच दिसून येत आहे.

याठिकाणी पाॅझिटिव्ह रूग्ण असलेल्या महिलांना सॅनिटरी नॅपकीन पॅड मिळत नाही.धक्कादायक म्हणजे अक्षरशः काही महिलांना नॅपकीन नसल्याने त्यांचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता. काही महिलांनी पालिका अधिकारी यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी पिंपरी याठिकाणी असलेल्या स्वयंसेविका महिला यांनी पिंपरी ते चाकण – म्हाळुंगे असा प्रवास करत स्वखर्चाने नॅपकीन पॅड पुरवला.

याआधि चाकण – म्हाळुंगे म्हाडा इमारतीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये सकाळच्या नाश्‍त्यात अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली होती . आता महिलांना उपयोगी असणाऱ्या वस्तू देखील येथे सोय केली जात नसल्याने येथील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मिटींगमध्ये आहे असे उत्तर दिले . 

Share this: