डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राजगृह’ या निवासस्थाची तोडफोड करणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक

वास्तव संघर्ष आॅनलाईन :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना घडली होती. या समाजकंटकांनी घराच्या काचांवर दगडफेक केली होती. तसेच या हल्ल्यात राजगृहातील कुंड्यांचंही मोठे नुकसान केले होते . या प्रकरणी उमेश जाधव या आरोपीला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज (बुधवार) विशाल मोरे नावाच्या मुख्य आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील दादर येथे असणारे राजगृह हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव असे महापुरुष आहेत त्यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. म्हणून या वास्तूला अन्यन साधारण महत्त्व आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थान आहे. दरम्यान या घटनेनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या घटनेनंतर सर्वांना शांतात राखण्याचं आवाहन केलं होतं

Share this: